मुलांचा भावनांक वाढवता येतो!
बालदिन विशेष - खूप पालक व मुलांमध्ये संवादच होत नाही. ही फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. टीव्ही, आयपॅड, मोबाईल फोन यातून मुलं संवाद शिकत नाहीत. त्यांना संवादाचं कसबच उमगत नाही. ती पुढे नाती कशी जोडणार? माणूस नात्यांतून घडतो व सक्षम होतो. नात्यांअभावी माणूस यंत्रवत व पोकळ होतो आणि दबलेल्या भावनांना चुकीच्या मार्गानं वाट देतो. त्यामार्गानं जायचं नसेल तर भावनिक क्षमता मुलांत बाणणं निकडीचं आहे........